Sanjay Raut | हा हेमा मालिनींचा आदर, गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याचं राऊतांकडून समर्थन
शिवसेना नेते संजय राऊत यांनी पाटील यांच्या या विधानाचं समर्थन केलं होतं. या प्रकारची तुलना आधीही झाली आहे. हा तर हेमा मालिनी यांचा सन्मान आहे. या विधानाकडे नकारात्मकरित्या पाहू नका. यापूर्वी लालूप्रसाद यादव यांनी याचं उदाहरण दिलं होतं. आम्ही सर्व हेमा मालिनींचा आदरच करतो, असं राऊत म्हणाले होते.
माझ्या मतदारसंघातील रस्ते अभिनेत्री हेमा मालिनीच्या गालासारखे आहेत, असं विधान राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं होतं. गुलाबराव पाटलांच्या या विधानावर भाजपने जोरदार आक्षेप घेतला होता. आता भाजपच्या खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनीही या विधानावर संताप व्यक्त केला आहे. सामान्य लोक बोलतात समजू शकतो. पण संसदीय राजकारणातील लोकांनी असं विधान करू नये, अशी प्रतिक्रिया हेमा मालिनी यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी पाटील यांच्या या विधानाचं समर्थन केलं होतं. या प्रकारची तुलना आधीही झाली आहे. हा तर हेमा मालिनी यांचा सन्मान आहे. या विधानाकडे नकारात्मकरित्या पाहू नका. यापूर्वी लालूप्रसाद यादव यांनी याचं उदाहरण दिलं होतं. आम्ही सर्व हेमा मालिनींचा आदरच करतो, असं राऊत म्हणाले होते.
पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'

