Special Report | अजित पवारांच्या पीएच्या नावानं धमकीचा फोन, खंडणी प्रकरणात सहा जणांना बेड्या-TV9

पुण्यातील बड्या बांधकाम व्यवसायिकाला (Pune Builder) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करुन धमकी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अ‍ॅपचा गैरवापर करुन आरोपींनी अजितदादांच्या नावाने फोन केल्याचा प्रकार समोर आला आहे.

पुणे : पुण्यातील बड्या बांधकाम व्यवसायिकाला (Pune Builderउपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करुन धमकी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अ‍ॅपचा गैरवापर करुन आरोपींनी अजितदादांच्या नावाने फोन केल्याचा प्रकार समोर आला आहे. अजित पवार यांचा पीए चौबे बोलत असल्याचं सांगून आरोपींनी 20 लाख रुपयांची खंडणी (Ransom) मागितल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणी पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी बिल्डरकडून दोन लाख रुपये उकळल्याची माहिती असून खंडणी प्रकरणात सहा जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

काय आहे प्रकरण ?

पुणे शहरातील एका बड्या बिल्डरला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पीए बोलत असल्याचं सांगणारा फोन आला होता. ॲपद्वारे अजित पवार यांच्या मोबाईल क्रमांकाचा गैरवापर करुन आरोपींनी त्यावरुन बांधकाम व्यवसायिकाला फोन केल्याची माहिती आहे. बिल्डरकडे 20 लाख रुपयांची खंडणी मागून यातील दोन लाख रुपये आरोपींनी घेतले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI