AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | आगीच्या घटनेत जमखी रुग्णांवर उपचार करण्यास 3 रुग्णालयांचा नकार?

Special Report | आगीच्या घटनेत जमखी रुग्णांवर उपचार करण्यास 3 रुग्णालयांचा नकार?

| Edited By: | Updated on: Jan 22, 2022 | 10:04 PM
Share

 मुंबईत आज लागलेल्या आगीत (Mumbai fire) सहा जणांचा मृत्यू झाला आहे. नाना चौक गवालिया टँक येथील भाटिया रुग्णालयाजवळील कमला (Kamla building Fire) इमारतीला ही आग लागली होती. या आगीत होरपळलेल्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले होते, मात्र तीन रुग्णालयांनी उपचार करण्यास नकार दिल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

मुंबई : मुंबईत आज लागलेल्या आगीत (Mumbai fire) सहा जणांचा मृत्यू झाला आहे. नाना चौक गवालिया टँक येथील भाटिया रुग्णालयाजवळील कमला (Kamla building Fire) इमारतीला ही आग लागली होती. या आगीत होरपळलेल्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले होते, मात्र तीन रुग्णालयांनी उपचार करण्यास नकार दिल्याची धक्कादायक माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori pednekar) यांनी दिली आहे. मसिना, व्होकहार्ड, रिलायन्स या रुग्णालयांनी उपचार नाकारले अशी नावंही किशोरी पडणेकर यांनी सांगितली आहेत. या रुग्णलयांनी अशा आणिबाणीच्या वेळेला उपचार का नाकारले? याबाबत चौकशीचे आदेश मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहेत. चौकशीनंतर योग्य ती कारवाई केली जाईल असेही महापौर म्हणाल्या आहेत.