Chandrapur | चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात वाघाचा मुक्त विहार, मजुरांनी काढला व्हिडीओ

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील वाघाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा वाघ वीज केंद्राच्या राख साठवण तलाव परिसरात स्वच्छंद फिरताना आढळला. या भागात काम करणाऱ्या मजुरांनी जेसीबी चालविताना हा व्हिडिओ घेतलाय.

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील वाघाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा वाघ वीज केंद्राच्या राख साठवण तलाव परिसरात स्वच्छंद फिरताना आढळला. या भागात काम करणाऱ्या मजुरांनी जेसीबी चालविताना हा व्हिडिओ घेतलाय. चंद्रपूर वीज केंद्रातील विस्तीर्ण परिसरात सुमारे चार वाघांचे वास्तव्य आहे. याशिवाय बिबटे-अस्वली आणि अन्य वन्यजीव देखील परिसरात सातत्याने दर्शन देत असतात. वाघांच्या या वाढत्या वावराने परिसरातील नागरीक आणि कामगार मात्र दहशतीत आहेत. नुकतेच वीज केंद्राच्या बाहेर कोळसा खाण विश्रामगृह परिसरात वन्यजीव हल्ल्यात कामगार जखमी झाला होता. वाघाच्या ताज्या व्हायरल व्हिडिओने चंद्रपूर वीज केंद्रातील वाघांच्या वास्तव्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI