AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 30 June 2021

TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 30 June 2021

| Edited By: | Updated on: Jun 30, 2021 | 12:53 PM
Share

औरंगाबादमध्ये पुन्हा एकदा लसीकरणासाठी (Aurangabad vaccination) गर्दी झाल्याचं चित्र आहे. मात्र आज औरंगाबादकरांनी रांग लावण्यासाठी अनोखी शक्कल लढवली. सोशल डिस्टन्समध्ये प्रत्यक्ष उभं राहण्याऐवजी, रांगेत चप्पल ठेवण्यात आली.

औरंगाबादमध्ये पुन्हा एकदा लसीकरणासाठी (Aurangabad vaccination) गर्दी झाल्याचं चित्र आहे. मात्र आज औरंगाबादकरांनी रांग लावण्यासाठी अनोखी शक्कल लढवली. सोशल डिस्टन्समध्ये प्रत्यक्ष उभं राहण्याऐवजी, रांगेत चप्पल ठेवण्यात आली. आपला नंबर आल्यानंतर चपलाजवळ येऊन ती पुढे सरकवायची असा प्रकार करण्यात येत आहे. चपला रांगेत आणि संबंधित व्यक्ती सावलीत, असं चित्र आज औरंगाबादेत पाहायला मिळालं.  राज्यात जसा लसींचा तुटवडा जाणवत आहे, तसाच औरंगाबादमध्येही आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर मोठमोठ्या रांगा लागत आहेत. काल तर औरंगाबादेतील लसीकरण केंद्रावर चेंगराचेंगरीची परिस्थिती होती. अनेकजण पहाटेपासून रांगा लावत आहेत, मात्र त्यांना विनालस घेता परतावं लागत आहे.