VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 26 July 2021

कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील वासनोली धरणाच्या सांडव्याला भगदाड पडले आहे. त्यामुळे वासनोली धरणासह वासनोली, तिरवडे, कडगाव या गावांना मोठा धोका निर्माण झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी कोसळणाऱ्या पावसाने विश्रांती घेतली आहे. कोल्हापुरातील भुदरगड तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. भुदरगड तालुक्यातील पावसामुळे अनेक प्रमुख मार्गांसह दहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील वासनोली धरणाच्या सांडव्याला भगदाड पडले आहे. त्यामुळे वासनोली धरणासह वासनोली, तिरवडे, कडगाव या गावांना मोठा धोका निर्माण झाला आहे. कोल्हापुरातील नदी-नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तसेच अनेक रस्त्यांवर पुराचे पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर काही घरातही पाणी शिरले आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI