VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 9 May 2022
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांच्या मागील अडचणींचा सिसेमिरा काही सुटताना दिसत नाहीये. हनुमान चालिसा प्रकरणातून सुटका झाल्यानंतर आता राणा दाम्पत्यांच्या मागे घरातील अनधिकृत बांधकामांचं शुक्लकाष्ठ लागलं आहे. राणा दाम्पत्यांनी खार येतील घरात अनधिकृत बांधकाम केल्याचा पालिकेला संशय आहे. त्यामुळे पालिकेचे अधिकारी आज राणा यांच्या घरी जाऊन पाहणी करणार आहेत.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांच्या मागील अडचणींचा सिसेमिरा काही सुटताना दिसत नाहीये. हनुमान चालिसा प्रकरणातून सुटका झाल्यानंतर आता राणा दाम्पत्यांच्या मागे घरातील अनधिकृत बांधकामांचं शुक्लकाष्ठ लागलं आहे. राणा दाम्पत्यांनी खार येतील घरात अनधिकृत बांधकाम केल्याचा पालिकेला संशय आहे. त्यामुळे पालिकेचे अधिकारी आज राणा यांच्या घरी जाऊन पाहणी करणार आहेत. यापूर्वीही पालिकेचे अधिकारी राणा यांच्या घरी गेले होते. या अधिकाऱ्यांनी राणा यांच्या घराची पाहणी करून नोटीस बजावली होती. मात्र, राणा दाम्पत्य तुरुंगात असल्याने पालिका अधिकारी घरातील बेकायदा बांधकामांवर कारवाई करू शकले नव्हते. आता मात्र, राणा दाम्पत्य घरी आल्याने आज पुन्हा एकदा पालिकेचे अधिकारी त्यांच्या घरी जाणार असून घरातील बेकायदा कामांची पाहणी करून अहवाल तयार करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..

