Chandrapur Forrest Machan | पर्यटकांनी अनुभवली ताडोबामधली अविस्मरणीय रात्र

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वन्यजीव प्रेमींनी अनुभवली बुद्धपौर्णिमेची वन्यजीव श्रीमंतीची रात्र, पाणवठया शेजारी उभारलेल्या उंच मचाणीवरून रात्रभर न्याहाळले वन्यजीव विश्व, देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि राज्यातूनही शेकडो पर्यटकांनी हा थरारक अनुभव घेतला.

सिद्धी बोबडे

| Edited By: सिद्धेश सावंत

May 17, 2022 | 2:32 PM

चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वन्यजीव प्रेमींनी बुद्धपौर्णिमेची (Buddha Purnima) वन्यजीव श्रीमंतीची रात्र अनुभवली. विविध पाणवठया शेजारी उभारलेल्या उंच मचाणीवरून त्यांनी रात्रभर कुतूहल आणि आश्चर्य अशा संमिश्र अनुभवानी वन्यजीव विश्व न्याहाळले. देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि राज्यातूनही शेकडो पर्यटकांनी या थरारक अनुभवाचा आनंद घेतला. वाघ -बिबटे -अस्वल -रानगवे -हरणांचे कळप -तृणभक्षी व हिंस्त्र अशा सर्व प्राण्यांच्या रात्रकाळातील हालचालींचा हौशी पर्यटक व वन्यजीव अभ्यासकांनी जवळून अभ्यास केला. चंद्रपूर जिल्ह्यासह राज्याच्या विविध राखीव वनांमध्ये बुद्धपौर्णिमेच्या शुभ्र चांदण्या रात्री अशाच प्रकारे निसर्ग अनुभव उपक्रमाचे आयोजन केले गेले. शेकडो पर्यटकांनी पहिल्यांदाच अशाप्रकारे रात्रीच्या काळात वन्यजीव विश्वातील हालचालींचा अनुभव घेतला. वनविभागाने या निसर्ग अनुभव उपक्रमासाठी उत्तम व्यवस्था केली होती.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें