Wardha News : शेतकऱ्यांना खुशखबर! तुरीच्या हमीभाव खरेदीला मिळाली मुदतवाढ
NAFED tur buying deadline : नाफेडच्या माध्यमातून हमीदरात तुरीची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
शासनाच्यावतीने नाफेडच्या माध्यमातून हमीदरात तुरीची खरेदी करण्यात येत आहे. वर्धा जिल्ह्यात देखील वेगवेगळ्या केंद्रांवर तुरीची खरेदी सुरू आहे. मात्र मध्यंतरी तूर खरेदीची मुदत संपल्यामुळे शासकीय तूर खरेदी बंद होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. बऱ्याच शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर येऊन परत जावं लागत होतं. आता मात्र शासनाकडून तूर खरेदीसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 28 मेपर्यंत शासनाने हमीदरात तूर खरेदीसाठी मुदत वाढवून दिलेली आहे.
ज्या शेतकऱ्यांनी नाफेडकडे नोंदणी केलेली होती त्या शेतकऱ्यांना तूर आता नाफेडला विक्री करता येणार आहे. सध्या तुरीचे हमीभाव 7 हजार 550 रुपये इतके आहे. मात्र बाजारभाव 6 हजार 500 ते 7 हजार रुपयांपर्यंत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खुल्या बाजारात तूर विक्री करावी लागत असल्याने क्विंटल मागे 500 ते 600 रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. मात्र आता नाफेडच्या माध्यमातून हमीदरात तूर खरेदीला मुदतवाढ मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

