Rane Brothers : नाहीतर अंगाशी येईल तुमच्या, मी अजून संयम ठेवून… राणे बंधू यांच्यात पुन्हा सोशल मीडियात ‘वॉर’ सुरू
मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्यात सोशल मीडियात पुन्हा 'वॉर' सुरू असल्याचे पाहायला मिळाले आहे. नितेश राणे यांनी ट्वीट करत थेट कशाप्रकारे धमकावलं याचे मेसेजच शेअर केले आहेत.
राणे बंधूंमध्ये पुन्हा एकदा ट्विटर वॉर झाल्याचे समोर आले आहे. मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्यात ट्विटर वॉर सुरू आहे. मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्याला असं धमकावणं बरोबर नाही, असं नितेश राणे म्हणाले. आपण महायुतीचे घटक आहोत, याची नोंद घ्याल, असं नितेश राणेंनी म्हटलंय. सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई यांना शिंदे गटाचे कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी धमकावण्याचे मेसेज केले. ‘नको ती वक्तव्य देऊ नका अंगाशी येईल तुमच्या नंतर वाचवायला कोणी येणार नाही…’, असं निलेश राणे यांनी म्हटलंय. तर अजून मी संयम ठेवून आहे, असं धमकावल्याचेही पाहायला मिळत आहे. दरम्यान, आता नितेश राणे यांच्या पोस्टला आमदार निलेश राणे काय प्रत्युत्तर देणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
आदरणीय निलेशजी ,
आपणच काही दिवसा अगोधर महायुती बदल बोलला होता..
आता असे आपल्याच मित्र पक्षाचा पदाधिकारी ला धमकवणे बरोबर नाही..
शेवटी आपण महायुतीचे घटक आहोत..
आपण नोंद घ्याल अशी अपेक्षा करतो @meNeeleshNRane pic.twitter.com/iMcMSTQVh3— Nitesh Rane (@NiteshNRane) June 18, 2025
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

