AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | द्राक्ष बागेत गव्यांचा धुडगूस, शेतकऱ्यांना पळता भूई थोडी, पाहा व्हिडीओ

| Updated on: Mar 15, 2021 | 12:00 AM
Share

तासगाव तालुक्यातील मनेराजुरी येथील द्राक्ष बागेत आज दोन गव्यांनी धुडगूस घातला. (bison damaged grapes crop)

सांगली : तासगाव तालुक्यातील मनेराजुरी येथील द्राक्ष बागेत आज दोन गव्यांनी धुडगूस घातला. यावेळी शेतकऱ्यांची पळता भुई थोडी झाली. हे दोन्ही गवे द्राक्षाच्या बागेतून सुसाट पळत होते. यावेळी द्राक्ष बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. (two bison damaged the grapes crop in sangli video goes viral)

मनेराजुरी येथील लांडगे वस्ती, जमदाडे वस्ती आणि करगणे मळा या पट्ट्यात अनेक शेतकऱ्यांच्या द्राक्षांच्या बागा आहेत. यावेळी शेतात दोन गव्यांनी द्राक्षांच्या बागांमध्ये प्रचंड धूडगूस घातला. गव्यांनी द्राक्ष बागांचे मोठे नुकसान केलं आहे. हा प्रकार घडल्यामुळे शेतकऱ्यांना पळता भूई थोडी झाली. गवा शेत तसेच गावात आल्याने ग्रामस्थांचायीत भीतीचे वातावरण पसरले आहे. तर वन विभाग आणि प्रशासनाकडून नागरिकांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मानजेरुरीत दोन गव्यांनी धुडगूस घातला, पाहा व्हिडीओ :

इतर बातम्या :

Bengaluru Zomato case | दोघांपैकी कोण खरं? बंगळुरु झोमॅटो प्रकरणाचा ‘हा’ व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल, एकदा पाहाच

VIDEO | पाठलाग करणाऱ्या मुलाला भर रस्त्यात फटके, व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल

VIDEO : मनमोहक समुद्र किनारा, धनश्रीचा डान्स, युजवेंद्र चहलचेही ठुमके, पंजाबी गाण्यावर दिग्गज थिरकले