AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bengaluru Zomato case | दोघांपैकी कोण खरं? बंगळुरु झोमॅटो प्रकरणाचा ‘हा’ व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल, एकदा पाहाच

झोमॅटो डिलिव्हरी बॉय आणि बंगळुरुची महिला यांच्यावरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. (bengaluru girl zomato delivery boy)

Bengaluru Zomato case | दोघांपैकी कोण खरं? बंगळुरु झोमॅटो प्रकरणाचा 'हा' व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल, एकदा पाहाच
हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
| Updated on: Mar 14, 2021 | 10:34 PM
Share

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. असे कित्येक जण आहेत जे शोशल मीडियाच्या जोरावार एका रात्रीत प्रसिद्धीच्या झोतात आले. सोशल मीडियामुळे असे अनेक किस्से समोर येतात ज्यांची चर्चे कैक दिवस चालते. बंगळुरुमध्ये एका झोमॅटो डिलिव्हरी बॉयने महिलेवर हल्ला करुन तिला जखमी केल्याचा आरोप झाला. हा आरोप खुद्द जखमी झालेल्या महिलेनेच केला. या प्रकरणाचा व्हिडीओसुद्धा आख्ख्या भरतभर व्हायरल झाला. फुटेलेल्या नाकासोबत या महिलेने सोशल मीडियावर टाकलेल्या त्या व्हिडीओची सगळीकडे चर्चा झाली. मात्र, झोमॅटो डिलिव्हरी बॉयची बाजू समोर आल्यानंतर या प्रकरणामध्ये वेगळे वळण घेतले. या दोघांपैकी नेमकं बरोबर कोण हा प्रश्न अनेकांना पडला. आता याच मुद्द्यावरुन सोशल मीडियावर खमंग चर्चा रंगली आहे. जखमी झालेली महिला खरी, की झोमॅटो डिलेव्हरी बॉयचं म्हणणं खरं?, यावर अनेक तर्क लावले जात आहे. याच मुद्द्याला घेऊन बनवण्यात आलेला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. (new sarcastic video on bengaluru girl hitting by zomato delivery boy case goes viral)

नेमका प्रकार काय ?

ऑर्डर कॅन्सल केली म्हणून एका झोमॅटो डिलेव्हरी बॉयने हल्ला करत नाकावर मारून जखमी केल्याचा आरोप बंगळुरु येथील एका महिलेने चार दिवसांपूर्वी केला. हा आरोप करताना तिने नाकातून रक्त येत असतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. तसेच या व्हिडीओत महिलेने तिच्यावर डिलिव्हरी बॉयने हल्ला करून तिला मारण्याचा तसेच जखमी केल्याचा गंभीर आरोप केला. हा व्हिडीओ काही क्षणांत प्रचंड व्हायरल झाला. महिलेच्या नाकातून रक्त वाहत असल्यामुळे साहजिकच तिला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद लाभला. डिलिव्हरी बॉयवर कडक कारवाई केली जावी, अशी जोरदार मागणी होऊ लागली. या प्रकरणाची दखल थेट झोमॅटो प्रशासनाने घेत जखमी महिलेला वैद्यकीय मदत देण्याची तयारी दाखवली.

डिलिव्हरी बॉयचा व्हिडीओ समोर येताच प्रचंड सहानुभूती

या प्रकरणानंतर डिलिव्हरी बॉयविरोधात संताप व्यक्त केला जात होता. त्यानंतर ज्या डिलिव्हरी बॉयवर महिलने आरोप केला होते, त्याचा व्हिडीओ समोर आला. यामध्ये महिलेने मलाच चपलीने मारण्याच प्रयत्न केल्याचा आरोप झोमॅटो बॉयने केला. तसेच माझ्यासोबत भांडण केले. यावेळी चपलेने मारताना प्रतिकार करत असताना महिलेचाच हात तिला स्व:तला लागला, असे स्पष्टीकरण त्या झोमॅटो डिलिव्हरी बॉयने दिले. तसेच, नंतर तो रडत रडत घरची परिस्थिती नाजूक असून मला शांतीने जगायचं असल्याची विनवनी करतानाचाही आणखी एक व्हिडीओ समोर आला. व्हिडीओनंतर डिलिव्हरी बॉयच्या बाजूने सोशल  मीडियावर पोस्टचा भडीमार सुरु झाला. काही क्षणांत बंगळुरुची महिली खोटं बोलत असून तिने डिलिव्हरी बॉयवर खोटे आरोप केले असल्याचे म्हटले जाऊ लागले. सोशल मीडियावर डिलिव्हरी बॉयची काहीही चूक नसल्याचे म्हटले जाऊ लागले.

घडलेल्या प्रकाराचे वेगवेगळे व्हर्जन

या सर्व प्रकारानंतर दोघेही आपापली बाजू सातत्याने मांडत होते. मीच कसा किंवा कशी खरी यासाठी दोघेही आटोकाट प्रयत्न करत होते. त्यानंतर या प्रकारचे भन्नाट मिम्स सोशल मीडियावर यायला सुरुवात झाली. त्यापैकीच एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये महिलेचे नाक फुटल्याचा प्रकार प्रत्येकाच्या नजरेतून सांगण्यात आलाय. या प्रकरणामध्ये स्त्रिवादी लोकांचं, स्त्रियांचा विरोध करणाऱ्यां लोकांच, खुद्द जखमी झालेली महिला, ज्या डिलिव्हरी बॉयवर आरोप झाले तो, अशा सर्वांच्या नजरेतून या प्ररणाची मांडणी या छोट्याशा व्हिडीओतून करण्यात आलीय.

अगदीच मार्मिकपणे विषय हाताळ्यामुळे हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. महिलेवर हल्ला झालेल्या प्रकाराचं बॉलिवूड व्हर्जन तर बघण्यासारखं आहे.

महिलेवर झालेल्या हल्ल्याचे वेगवगेळ्या व्हर्जनचा हाच तो व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे, पाहा व्हिडीओ 

View this post on Instagram

A post shared by Chudarshan (@chudarshan)

इतर बातम्या :

ऑर्डर कॅन्सल केली म्हणून डिलीव्हरी बॉय भडकला, रागाच्या भरात महिलेचं फोडलं नाक

नवरा बायको रोजच्या भांडणाला कंटाळले, बघा त्यांनी त्यावरचा मार्ग काय काढला?

(new sarcastic video on bengaluru girl attacked by zomato delivery boy case goes viral)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.