नवरा बायको रोजच्या भांडणाला कंटाळले, बघा त्यांनी त्यावरचा मार्ग काय काढला?

पती-पत्नीमध्ये जितकं भांडण होतं तितकं त्यांच्यातीन नातं घट्ट होतं, असं म्हणतात. मात्र, युक्रेनच्या एका दाम्पत्याने दररोजच्या भांडणाला कंटाळून आपापसातील नातं आणती घट्ट व्हावं यासाठी वेगळा प्रयोग केला आहे (Ukrainian Couple Handcuff Themselves).

नवरा बायको रोजच्या भांडणाला कंटाळले, बघा त्यांनी त्यावरचा मार्ग काय काढला?
नवरा बायको रोजच्या भांडणाला कंटाळले, बघा त्यांनी त्यावरचा मार्ग काय काढला?

किव (युक्रेन) : संसार म्हटल्यावर भांड्याला भांड लागणारच आणि त्यावरुन वादविवाद होणं ही एक अतिशय सामान्य बाब आहे. याशिवाय पती-पत्नीमध्ये जितकं भांडण होतं तितकं त्यांच्यातीन नातं घट्ट होतं, असं म्हणतात. मात्र, युक्रेनच्या एका दाम्पत्याने दररोजच्या भांडणाला कंटाळून आपापसातील नातं आणती घट्ट व्हावं यासाठी वेगळा प्रयोग केला आहे. या जोडप्याने एकमेकांना बेडीत अडकवून घेतलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी तीन महिने तसंच राहण्याचं ठरवलंय. त्यामुळे त्यांचा हा प्रयोग जगभरात चर्चेला कारण ठरत आहे (Ukrainian Couple Handcuff Themselves).

नेमकं प्रकरण काय?

अलेक्झांडर आणि व्हिक्टोरिया यांनी व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी दोघांमधील नातं घट्ट व्हावं यासाठी एक वेगळाच निर्णय घेतला. दोघांनी एकमेकांना एकाच बेडीत अडकवलं. तेव्हापासून ते प्रत्येक क्षण एकत्रच असतात. दिवसातील संपूर्ण 24 तास ते एकमेकांसोबत एकमेकांसाठी उपलब्ध असतात. मग ते जेवताना, आंघोळ करताना, कपडे घालताना सोबतच असतात. बेडीत अडकल्याने दोघांना कपडे परिधान करण्यास अडचणी येतील म्हणून दोघांनी त्या पद्धतीचे कपडे देखील तयार केले आहेत (Ukrainian Couple Handcuff Themselves).

आठवड्यातून दोनदा ब्रेकअप

अलेक्झांडर आणि व्हिक्टोरियाने यांच्यात आठवड्यातून निदान दोनदा तरी ब्रेकअप व्हायचा. त्यामुळे यावर्षीच्या व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी अलेक्झांडरने वादविवाद होऊ नये यासाठी काहीतरी वेगळा प्रयोग करण्याचं ठरवलं. त्यातूनच एकमेकांना बेडीत अडकवण्याचा विचार त्याच्या मनात आला. त्याने ही कल्पना त्याची पत्नी व्हिक्टोरियाला सांगितली. सुरुवातीला व्हिक्टिरियाने त्यासाठी नकार दिला. मात्र, पतीच्या आनंदासाठी आपण तयार झालो, अशी प्रतिक्रिया व्हिक्टोरियाने राऊटर्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

‘प्रेमाखातर मान्य केलं’

“मी विचार केला, हा माझ्यासाठी एक मजेशीर अनुभव असेल, ज्यामुळे माझ्या आयुष्यात नव्या गोष्टी घडतील. नव्या उज्ज्वल भावना निर्माण होतील, ज्या मी यापूर्वी कधीच अनुभवल्या नसतील. याशिवाय माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे. म्हणून मी हे सर्व करायचं ठरवलं,” अशी प्रतिक्रिया व्हिक्टोरियाने दिली.

आता वाद होतात का?

अलेक्झांडर आणि व्हिक्टोरिया हे सतत एकमेकांसोबत असतात. त्यांच्या या प्रयोगामुळे त्यांचे आता वाद होत नाहीत का? असा प्रश्न अनेकांना पडतो. यावर व्हिक्टोरियाने उत्तर दिलं. “आमच्यातली भांडणं नाहीशी झाली, असं नाही. आम्ही अजूनही लढतो. पण आपण जेव्हा भांडण करतो तेव्हा रागाच्या भरात एकमेकांशी बोलणं बंद करतो. या प्रयोगातून आम्ही थोडे अंतर्मुख झालो”, असं व्हिक्टोरियाने सांगितलं.

हेही वाचा : PHOTO | लेडी गागाचे श्वान महिलेने शोधले, साडेतीन कोटींचं बक्षीस मागताच नकार, कारण काय?

Published On - 11:32 pm, Thu, 11 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI