SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 11 September 2021

नागपुरातील खापरखेडा येथील चनकापूरमध्ये भीषण घटना घडली आहे. येथे नियमित सरावासाठी मैदानावर आलेल्या खेळाडूंवर वीज कोसळल्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. एक खेळाडू गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. मृत्यू झालेल्या खेळाडूंमध्ये एक धावपटू तर दुसरा फुटबॉलपटू आहे

नागपुरातील खापरखेडा येथील चनकापूरमध्ये भीषण घटना घडली आहे. येथे नियमित सरावासाठी मैदानावर आलेल्या खेळाडूंवर वीज कोसळल्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. एक खेळाडू गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. मृत्यू झालेल्या खेळाडूंमध्ये एक धावपटू तर दुसरा फुटबॉलपटू आहे. थेट अंगावर वीज कोसळल्यामुळे मृतांचे शरीर पूर्णपणे भाजले. यातच त्यांचा मृत्यू झाला. तन्मय दहीकर आणि अनुज कुशवाह अशी मृतांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार नागपूरमधील चनकापूर येथे खुलै मैदान आहे. या मैदानावर खेळाडून नियमित सरावासाठी येतात. येथे काही खेळाडू धावण्याचा सरावर करतात तर काही खेळाडू क्रिकेट, फुटबॉल असे खेळ खेळतात. आजही (10 सप्टेंबर) बरेच खेळाडू चनकापुरातील मैदानावर जमले होते. यावेळी अचानकपणे आकाशात काळे ढग जमा झाले तसेच पावसाला सुरुवात झाली. अचानकपणे पाऊस आल्यामुळे खेळाडू मैदानावर असलेल्या शेडकडे धावले. यावेळी मृत अनुज आणि तन्मय हे मागे मैदानावरच राहिले. दोघेही सोबतच शेडकडे धावत होते. मात्र यावेळी त्यांच्या अंगावर अचाकनपणे वीज कोसळली. थेट अंगावर वीज कोसळल्यामुळे दोघांचाही जागीच मृत्यू झाला. तर सक्षम गोठीफोडे नावाचा खेळाडू यामध्ये गंभीर जखमी झाला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI