उदय सामंत यांनी छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांना जोडले हात, म्हणाले…
गेल्या काही दिवसांपासून मराठा समाज आणि ओबीसींच्या आरक्षणावरून मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यात शाब्दिक चकमक सुरू आहे. यावर आता राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी भाष्य केलं असून त्यांनी दोघांनाही समाजात तेढ निर्माण होणार नाही अशी वक्तव्य करू नये यासाठी हात जोडून विनंती केलीय
पुणे, पिंपरी चिंचवड, २३ डिसेंबर, २०२३ : गेल्या काही दिवसांपासून मराठा समाज आणि ओबीसींच्या आरक्षणावरून मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यात शाब्दिक चकमक सुरू आहे. यावर आता राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी भाष्य केलं असून त्यांनी दोघांनाही समाजात तेढ निर्माण होणार नाही अशी वक्तव्य करू नये यासाठी हात जोडून विनंती केलीय. ओबीसी बांधवांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असं आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिलं. उदय सामंत यांच्या हस्ते पिंपरी- चिंचवडमध्ये अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या बाल नाट्य नगरीच्या सभा मंडपाचे भूमिपूजन झाले, त्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. शहरातून वाहणाऱ्या पवना आणि इंद्रायणी नदीच्या प्रदूषणावर लवकरच डीपीआर सादर होणार असून त्यासाठी दोन हजार कोटींचा खर्च येणार असल्याचं म्हटलं आहे, यामध्ये महानगरपालिका, पीएमआरडीए आणि एमआयडीसी असेल असं देखील त्यांनी अधोरेखित केलं.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?

