Uday Samant : जे त्यांच्याबरोबर आहेत, ते जोडण्यापेक्षा तोडण्याचे काम करत आहेत; उदय सामंतांची टीका
उद्धव साहेबांचा आमच्या मनातला आदर आहे, तो कायम राहणार. शिवसैनिकाला जसे दुःख झाले तसे मलाही झाले. उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) राजीनामा द्यावा लागला. तर शाखाप्रमुख म्हणून शिंदेंनी काम केले, असे उदय सामंत म्हणाले.
पुणे : शिवसेना नेतृत्व कमी पडले नाही. जे त्यांच्याबरोबर आहेत, ते जोडण्यापेक्षा तोडण्याचे काम करत आहेत, अशी टीका शिवसेनेचे बंडखोर नेते उदय सामंत (Uday Samant) यांनी केली आहे. ते पुण्यात बोलत होते. आम्ही गद्दार नसल्याचेदेखील त्यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, की आम्ही उठाव केला. ही एक मोहीम आहे. आमच्यावर खालच्या स्तरात बोलण्यात आले. डुक्कर, गद्दार, बाटगे… नाही त्या शब्दांत बोलले. मात्र ठीक आहे. जनता याला विटली आहे, असे ते म्हणाले. तर एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) कुठेही म्हटले नाही, की शिवसेना घेण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. उद्धव साहेबांचा आमच्या मनातला आदर आहे, तो कायम राहणार. शिवसैनिकाला जसे दुःख झाले तसे मलाही झाले. उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) राजीनामा द्यावा लागला. तर शाखाप्रमुख म्हणून शिंदेंनी काम केले, असे उदय सामंत म्हणाले.
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
