संभाजीराजे माझे भाऊ, मी त्यांना भेटणार, 3 ते 4 दिवसात भेट होईल : उदयनराजे भोसले
उदयनराजे भोसले यांनी आपण लवकरच संभाजीराजे यांना भेटणार असल्याचे स्पष्ट केले आहे. काही पूर्वनियोजित गोष्टींमुळे मला ही भेट लांबणीवर टाकावी लागली. (Udayanraje Bhonsle)
सातारा: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी संभाजीराजे छत्रपती आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यात नियोजित असलेली बैठक आता लांबणीवर पडली आहे. शुक्रवारी पुण्यात हे दोन्ही नेते भेटणार होते. मात्र, ऐनवेळी ही बैठक रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ही भेट लांबवणीवर पडण्यामागे नेमकं कारण काय असावं, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मात्र, उदयनराजे भोसले यांनी आपण लवकरच संभाजीराजे यांना भेटणार असल्याचे स्पष्ट केले आहे. काही पूर्वनियोजित गोष्टींमुळे मला ही भेट लांबणीवर टाकावी लागली. कोणीही त्याचा चुकीचा अर्थ काढू नये. संभाजीराजे आणि मी भाऊ आहोत. मी प्रत्येक कार्यात त्यांच्यासोबत आहे. माझी कामं आटोपल्यानंतर दोन-तीन दिवसांत मी संभाजीराजे यांना भेटेने, असे उदयनराजे भोसले यांनी सांगितले.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

