Udayanraje Bhosale Video : ‘… त्यांना डोकं चेक करण्याची गरज’, उदयनराजेंचा पुणे पोलीस आयुक्तांना सल्ला
वादग्रस्त विधान करणाऱ्या सोलापूरकरवर प्रथमदर्शनी गुन्हा होत नाही असं म्हणणाऱ्या पुण्याच्या पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना उदयनराजे यांनी डोकं तपासण्याचा सल्ला दिलाय.
पुणे पोलीस आयुक्त यांनी राहुल सोलापूरकरला प्रथमदर्शनी क्लिनचीट दिल्यानंतर उदयनराजे यांनी संताप व्यक्त केला. राहुल सोलापूरकर, शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जो बोलला त्यामध्ये प्रथमदर्शनी कोणताही गुन्हा वाटत नाही, असं वक्तव्य चक्क पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केलं. त्यावर अमितेश कुमार यांना एकदा डोकं चेक करून घेण्याची गरज असल्याचा सल्ला उदयनराजे यांनी दिलाय.दरम्यान पोलीस नाही तर सरकारच्या आशीर्वादानेच राहुल सोलापूरकरवर कारवाई होत नसल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. विशेष म्हणजे अनेक सत्ताधारी आणि विरोधक देखील राहुल सोलापूरकरवर कारवाईची मागणी करत आहेत. तीस पेक्षा जास्त संस्था आणि संघटनांनी सोलापूरकर विरोधात आंदोलन केली आहे. समाज माध्यमातून सोलापूरकर विरोधात तीव्र संताप व्यक्त झाला आहे. ज्या भांडारकर संशोधन मंडळामध्ये सोलापूरकर विश्वस्त होता त्या संस्थेने देखील वादग्रस्त वक्तव्याबद्दल त्याचा राजीनामा घेतला आहे. सोलापूरकरच्या सोसायटी भोवतीच्या पोलीस बंदोबस्ताने वैतागलेल्या शेजारच्यांनी देखील सोलापूरकर विरोधात कारवाईची मागणी केली आहे. मात्र इतके दिवस लोटल्यानंतरही सोलापूरकर विरोधात साधा गुन्हा देखील दाखल झालेला नाही. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..

