Uddhav, Raj Thackeray Victory Rally LIVE: विजय मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे कार्यक्रम स्थळी दाखल
Uddhav, Raj Thackeray Victory Rally LIVE Updates in Marathi: शिवसेना आणि मनसेच्या विजय मेळाव्यासाठी आता शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे दाखल झाले आहेत.
शिवसेना आणि मनसेच्या विजय मेळाव्यासाठी आता शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे देखील आता वरळी डोम येथे कार्यक्रम स्थळी दाखल झालेले आहेत. उद्धव ठाकरे कार्यक्रम स्थळी दाखल झाल्यावर त्यांच्या भोवती कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती.
हिंदी सक्तीचा जीआर रद्द केल्यानंतर ठाकरे बंधूंकडून आज कोणत्याही पक्षाचा झेंडा हाती न घेता मराठीच्या मुद्द्यावर आज विजयी मेळावा घेण्यात येत आहे. या मेळाव्यात तब्बल 18 वर्षांनी ठाकरे बंधु एकत्र दिसणार आहेत. हा ऐतिहासिक क्षण याची दही याची डोळा बघण्यासाठी कार्यकर्त्यांनी देखील मोठ्या संख्येने गर्दी केलेली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना ऐकण्यासाठी आणि एकत्र बघण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोकं आले आहेत. त्यामुळे वरळी डोमबाहेर तोबा गर्दी झाल्याची सध्या परिस्थिती निर्माण झाली आहे. अभूतपूर्व असा हा क्षण असणार आहे.
Published on: Jul 05, 2025 12:05 PM
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
