ST Worker Strike | ..आंदोलन करु नका ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं ST कर्मचाऱ्यांना आवाहन
एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी, राज्य शासन मनापासून प्रयत्न करत आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीचे आवाहन करत प्रवाशांना वेठीस धरणारं आंदोलन करु नका, असं आवाहन केलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी, राज्य शासन मनापासून प्रयत्न करत आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
उच्च न्यायालयासमोर देखील शासनाने आपला प्रश्न सोडविण्यासाठी काय काय पाऊले उचलत आहोत ते सांगितले असून न्यायालयाचे देखील समाधान झाले आहे. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा काढण्यासाठी आपण विशेष समिती नेमून कामही सुरू केलं आहे. अशा परिस्थितीत माझी आपणास हात जोडून विनंती आहे की, कृपया राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
Love You बोल... कार्यकर्त्याला दादांचं उत्तर अन् एकच हस्यकल्लोळ
माझ्या आई-वडिलांवर बोललात, शरम.. CM फडणवीस यांचा ठाकरे बंधूंवर घणाघात
घरी आदानी येऊन गेले म्हणून पापं झाकायची का? राज ठाकरे यांचे थेट प्रत्य
तुम्ही म्हणजे मुंबई, महाराष्ट्र नाही... फडणवीस यांचा ठाकरेंवर घणाघात

