AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray : भाजपच्या बुडाला आग लागलीय, समजू शकतो; उद्धव ठाकरेंची खोचक टीका

Uddhav Thackeray : भाजपच्या बुडाला आग लागलीय, समजू शकतो; उद्धव ठाकरेंची खोचक टीका

| Updated on: Jul 07, 2025 | 3:29 PM
Share

Uddhav Thackeray News : शिवसेना (यूबीटी) नेते उद्धव ठाकरे यांनी आज हिंदी भाषेच्या मुद्यावरून भाजपवर तीव्र हल्ला चढवला.

शिवसेना (यूबीटी) नेते उद्धव ठाकरे यांनी भाजपवर तीव्र हल्ला चढवताना म्हटले की, आम्ही आनंदात असताना आमच्यात आग लावण्याचे काम भाजप करत आहे. त्यांचे राजकारण ‘तोडो आणि फोडो’ असे आहे. त्यांच्या स्वतःच्या बुडाला आग लागली आहे. मराठी भाषेच्या हक्कासाठी महाराष्ट्रात जे काही करावे लागेल, ते आम्ही करू, असे ठामपणे सांगत त्यांनी भाजपच्या धोरणांवर टीका केली.

ठाकरे पुढे म्हणाले, काही तरस प्राण्यासारखे लोक आहेत, ज्यांना आमचा आनंद पाहवत नाही. मराठीच्या हक्कासाठी आंदोलन करणाऱ्यांची तुलना दहशतवाद्यांशी करणारे हे मराठीचे खरे मारेकरी आहेत. भाजपने मराठी भाषेच्या वादाची तुलना पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यांशी केल्याचा उल्लेख करत ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला, पहलगाममधील दहशतवादी कुठे गेले? ते भाजपमध्ये सामील झाले का? खरी भाजप आता मेली आहे. शिवसेनेसोबत जी भाजप होती, ती आता अस्तित्वात नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हंटलं.

Published on: Jul 07, 2025 03:29 PM