मी जनतेची माफी मागणार… उद्धव ठाकरे असं का म्हणाले?
उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) गटातील सहा खासदारांच्या बंडखोरीनंतर उद्धवठाकरे यांनी पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली, आज त्यांच्या यवतमाळ दौऱ्याआधी ते माध्यामांसमोर व्यक्त झाले. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. या पत्राकार परिषदेत त्यांच्यासोबन खासदार संजय राऊत तसेच इतर नेतेही उपस्थि होते.

उद्धव ठाकरे यांनी फुटीर खासदारांबाबत बोलताना सांगितलं की या खासदारांची भाषा ऐकून मला लाज वाटतेय की, इतके वर्ष ही लोकं माझ्या सोबत होती. महत्त्वाचं म्हणजे, माझ्या शब्दावर जनतेने काहीही विचार न करता, या खासदारांना निवडून दिलं आज त्यांनी लोकांचा विश्वासघात केला त्याबद्दल मी जनतेची माफी मागणार आहे.’ पुढे ठाकरे म्हणाले, मला खात्री आहे फुटले ते खसादार आणि निष्ठेने राहिले ते माझे कार्यकर्ते त्यामुळे बंडखोरी करणाऱ्यांनी जाणंच योग्य होतं.’ ठाकरेंच्या मतदार संघातील दोऱ्यांमुळे आता फुटीर खासादांच्या अडचणी वाढतील की काय? अशा चर्चा आहेत.
दरम्यान, नागपूर येथे पोहेचताच कार्यकर्त्यांनी ठाकरेंचं जंगी स्वागत केलं. यावेळी ते म्हणाले, “दोन चार गद्दार फोडल्यानं शिवसेना संपत नसते. विरोधकांच्या कितीही पिढ्या उतरल्या तरी शिवसेना संपवू शकणार नाहीत,” यावरून आधीच त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून आलं. आता त्यांनी पत्राकार परिषदेतूनही विरोधकांवर थेट हल्लाबोल केला.
Published on: Jun 27, 2026 12:08 PM
मी जनतेची माफी मागणार... उद्धव ठाकरे असं का म्हणाले?
मोठी बातमी! विमानात मी अन् फडणवीस... खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी
ठाकरेंचे शिलेदार अरविंद सावंतांचा राग पुन्हा एकदा उफाळला, माध्यमांसमोर
ओमराजे थेट आंध्र प्रदेशला... नवस फेडण्यासाठी चक्क... नेमकं काय घडलं?