Uddhav thackeray : शेतकऱ्यांच्या पॅकेजला उद्धव ठाकरेंचा पाठिंबा, पण सरकारला घातली एकच अट, दिलं मोठं चॅलेंज!
उद्धव ठाकरेंनी सरकारला दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात १ लाख रुपये जमा करण्याचे आव्हान दिले आहे. सरकारने जाहीर केलेल्या साडेतीन लाखांच्या पॅकेजच्या समर्थनासाठी ही अट ठेवली आहे. ठाकरे यांनी पीक विमा योजना, विमा कंपन्यांकडून होणारी प्रीमियम वसुली आणि शेतकऱ्यांच्या हक्कांकडे दुर्लक्ष करण्याबद्दलही तीव्र नाराजी व्यक्त केली.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकारला शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजवरून जोरदार आव्हान दिले आहे. खरडून गेलेल्या जमिनीसाठी सरकारने मनरेगामार्फत प्रति हेक्टर तीन ते साडेतीन लाख रुपये देण्याची घोषणा केली असली तरी, दिवाळीपूर्वी त्यापैकी किमान १ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची अट ठाकरेंनी ठेवली आहे. केवळ ही अट पूर्ण झाल्यासच आपण सरकारच्या पॅकेजचे समर्थन करू, असे त्यांनी स्पष्ट केले. इतकंच नाहीतर ठाकरे यांनी सध्याच्या पीक विमा योजनेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र आणि राज्य सरकारसोबत शेतकरीही विम्याचा हप्ता भरत असताना, १ रुपयात पीक विमा ही योजना बंद का पडली, असा सवाल त्यांनी विचारला. कापसासाठी ६० रुपये प्रति हेक्टर आणि सोयाबीनसाठी ५८,००० रुपये प्रति हेक्टर प्रीमियम घेतला जात असताना, शेतकऱ्यांचे पीक उद्ध्वस्त झाल्यावर त्यांना विम्याचे पैसे का मिळत नाहीत, असा संताप त्यांनी व्यक्त केला. सरकार शेतकऱ्यांच्या मतांवर निवडून येते, मात्र त्यांचे न्याय हक्क मागितल्यावर त्यांना राजकारण करू नका असे सांगते, अशी टीकाही ठाकरेंनी केली. सरकारने तात्काळ शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात

