सुभाष देसाई यांचे पुत्र हाती धनुष्यबाण घेणार, भूषण देसाई यांची शिवसेनेत एन्ट्री?
VIDEO | उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का... सुभाष देसाईंचे पुत्र भूषण देसाई एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार
मुंबई : उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. दरम्यान, भूषण देसाई यांचा आजच शिवसेनेत प्रवेश होणार असून ते आजच धनुष्यबाण हाती घेणार आहेत. तर बाळासाहेब भवन येथे भूषण देसाई यांचा शिवसेनेतील पक्ष प्रवेश होणार असल्याचे सांगितले जात आहे. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून एकच खळबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे. इतकेच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई असल्याचेही चर्चा होत आहे.
Published on: Mar 13, 2023 06:35 PM
Latest Videos
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात

