माहीम मजार कारवाईवर उद्धव ठाकरे यांचा राज ठाकरे यांना टोला म्हणाले…
VIDEO | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवाजीपार्कवर गुढीपाडव्याला झालेल्या जाहीर सभेवर उद्धव ठाकरे यांचा निशाणा
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवाजीपार्कवर गुढीपाडव्याला जाहीर सभा झाली. यासभेत राज ठाकरे यांनी व्हिडीओ दाखवत माहीममधील एका अनधिकृत मजारीबद्दल उल्लेख केला आणि राज ठाकरे यांनी माहीमच्या खाडीतील अनधिकृत दर्ग्याबाबत आवाज उठवला. हा दर्गा अनधिकृत आहे. त्यावर कारवाई करा, नाही तर आम्ही तिथे गणपतीचं मंदिर बांधू, असा इशारा देतानाच राज ठाकरे यांनी प्रशासनाला कारवाईसाठी एक महिन्याची मुदत दिली. त्यांच्या या भाषणानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच कारवाई झाली. राज ठाकरे यांनी माहीमच्या खाडीत नवीन हाजी अली तयार होत असल्याचा खळबळजनक दावा भाषणात केला आहे. दरम्यान राज ठाकरे यांचं भाषण ही भाजपची स्क्रिप्ट असल्याचा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. जशी स्क्रिप्ट आली असेल तशीच राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात वाचली असेल असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य

