उद्धव ठाकरे यांनी ‘मोदी का परिवार’वरून मोदींना डिवचलं, तुमचा परिवार कुठे?
मोदी परिवारवरून उद्धव ठाकरेंनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. ‘मैं मोदी का परिवार हुँ’ यावरून बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “ही परिस्थिती केवळ महाराष्ट्रात नाही. तर काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत ही परिस्थिती सारखीच आहे
मुंबई, १७ मार्च २०२४ : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आज मुंबईत समारोप होतोय. या समारोपाच्या निमित्ताने इंडिया आघाडीची मुंबईत भव्य सभा आयोजित करण्यात आलीय. या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजवर जोरदार हल्लाबोल केला. मोदी परिवारवरून उद्धव ठाकरेंनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. ‘मैं मोदी का परिवार हुँ’ यावरून बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “ही परिस्थिती केवळ महाराष्ट्रात नाही. तर काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत ही परिस्थिती सारखीच आहे. आपण इंडिया आघाडीची बैठक घेतली. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत होते विरोधकांची बैठक आहे. आम्ही विरोधक आहोत. पण हुकूमशाहीच्या विरोधातले आहोत. तुम्ही घराणेशाहीवर आरोप करता. तुमच्या परिवारात तुम्ही आणि तुमची खुर्ची एवढाच परिवार आहे. बाकी परिवार आहे कुठे?”, असा खोचक सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

