AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमचा परिवार आहेच कुठे?; उद्धव ठाकरे यांनी ‘मोदी का परिवार’वरून डिवचले

"आम्ही विरोधक आहोत. पण हुकूमशाहीच्या विरोधातले आहोत. तुम्ही घराणेशाहीवर आरोप करता. तुमच्या परिवारात तुम्ही आणि तुमची खुर्ची एवढाच परिवार आहे. बाकी परिवार आहे कुठे?", असा खोचक सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

तुमचा परिवार आहेच कुठे?; उद्धव ठाकरे यांनी 'मोदी का परिवार'वरून डिवचले
| Updated on: Mar 17, 2024 | 8:44 PM
Share

मुंबई | 17 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करत एक गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. ‘मैं मोदी का परिवार हुँ’, अशा आशयाचं हे गाणं आहे. या गाण्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी आणि भाजवर निशाणा साधला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आज मुंबईत समारोप होतोय. या समारोपाच्या निमित्ताने इंडिया आघाडीची मुंबईत भव्य सभा आयोजित करण्यात आलीय. या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजवर सडकून टीका केली. “महात्मा गांधी यांनी ४२ साली छोडो भारतचा नारा दिला होता. देशात जी हुकूमशाही टपलेली आहे तिला हद्दपार करण्यासाठी तुम्ही शिवाजी पार्क निवडलं त्याबद्दल आभार मानतो. भाजप हा फुगा आहे. या फुग्यात हवा भरण्याचं काम आम्ही केलं”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

“संपूर्ण देशात त्यांचे दोन खासदार होते. त्या फुग्यात आम्ही हवा भरली, आता त्यांच्या डोक्यात हवा गेली. त्यांनी ४०० पारचा नारा दिला. काय फर्निचरचं दुकान आहे का? खुर्च्या बनवत आहात का? ४०० पार म्हणजे काय फर्निचरचं दुकान काढत आहात का?”, असे प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला.

‘आम्ही विरोधक आहोत, पण हुकूमशाहीच्या विरोधातले’

“ही परिस्थिती केवळ महाराष्ट्रात नाही. तर काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत ही परिस्थिती सारखीच आहे. आपण इंडिया आघाडीची बैठक घेतली. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत होते विरोधकांची बैठक आहे. आम्ही विरोधक आहोत. पण हुकूमशाहीच्या विरोधातले आहोत. तुम्ही घराणेशाहीवर आरोप करता. तुमच्या परिवारात तुम्ही आणि तुमची खुर्ची एवढाच परिवार आहे. बाकी परिवार आहे कुठे?”, असा खोचक सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

“ही लढाई संविधान वाचवायची आहे. बाळासाहेब म्हणायचे, याची सुरुवात कोर्टापासून करा. कोर्टात जो साक्ष द्यायला येतो. तो धर्मग्रंथावर हात ठेवतो. त्याऐवजी संविधान ठेवा”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.