Uddhav Thackeray : थेट कर्जमाफी द्या, पुनर्गठन नको… शेतकऱ्यांसाठी आग्रही मागणी करत सरकारलं घेरलं
छत्रपती संभाजीनगर येथील हंबरडा मोर्चा मधून उद्धव ठाकरे यांनी सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली. शेतकऱ्यांसाठी थेट कर्जमाफीची मागणी करत, पुनर्गठन नको असे ते म्हणाले. सरकारने दिलेले ३१ हजार कोटींचे पॅकेज ही ऐतिहासिक थाप असून, दिवाळीपूर्वी मनरेगातून एक लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आव्हान त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.
छत्रपती संभाजीनगर येथे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने हंबरडा मोर्चा काढत राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांनी थेट कर्जमाफीची मागणी केली असून, कर्जाचे पुनर्गठन करण्याऐवजी पूर्ण कर्जमुक्त करा असे म्हटले. सरकारने जाहीर केलेले ३१ हजार कोटींचे पॅकेज ही इतिहासातील सर्वात मोठी थाप असल्याचा आरोप त्यांनी केला.
या मोर्चामध्ये संजय राऊत, आदित्य ठाकरे, अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे सहभागी झाले होते. उद्धव ठाकरे यांनी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मनरेगाचे एक लाख रुपये देण्याची मागणी केली. कुक्कुटपालन आणि दुधाळ जनावरांसाठी दिलेली मदत तुटपुंजी असल्याचा दावा करत, कोंबडीसाठी १०० रुपये आणि गाईसाठी ३७ हजार रुपये हे अत्यंत कमी असल्याचे त्यांनी नमूद केले.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?

