‘कितीही आमदार, खासदार गेले तरी…’, ठाकरे गटानं पुन्हा विरोधकांना फटकारलं, बघा काय केला हल्लाबोल
VIDEO | राज्यात सत्तातंर झाल्यानंतर शिवगर्जना यात्रा जोरदार सुरु, ठाकरे गटानं पुन्हा एकदा ठामपणे विरोधकांना सुनावलं…
रत्नागिरी : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर चिन्ह आणि पक्ष एकनाथ शिंदे गटाकडे गेले. यानंतर ठाकरे गटाची आणि उद्धव ठाकरे यांची रत्नागिरीतील उद्या पहिलीच सभा होणार आहे. त्यामुळे शिवसैनिकांसह संपूर्ण राज्याचे लक्ष या सभेकडे लागले आहे. या सभेविषयी बोलताना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी सांगितले की, आमदार आणि खासदार कितीही गेले तरी, खरी शिवसेना ही शिवसैनिकांवर कशी टिकून आहे, हे उद्याच्या या विराट सभेमुळे राज्यातील लोकांना समजणार आहे. तर दुसरीकडे सत्तातंर झाल्यानंतर शिवगर्जना यात्रा जोरदार पणे सुरु आहे. उद्धव ठाकरे यांची पहिल्यांदाच मुंबईबाहेर अशी ही रत्नागिरीत सभा होते आहे त्यामुळे या सभेला शिवसैनिकांची अफाट गर्दी असणार आहे आहे असा विश्वासही अनिल परब यांनी व्यक्त केला आहे. यासह ते असेही म्हणाले की, खरी शिवसेना ही सामान्य शिवसैनिकांवर उभी आहे. त्यामुळे खासदार आणि आमदार गेले तरी आता जी शिवसेना महाराष्ट्रात दिसत आहे.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

