‘ते आनंद दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील…’, ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल
शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या ठाण्यातील टेंभी नाका येथे असणाऱ्या आनंद आश्रमात नोटा उधळल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी संबंधित व्हिडीओ ट्विट केला आहे. यानंतर एकच विरोधकांनी टीकास्त्र डागलं.
नोटा उधळणारे दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील शिवसैनिक होते, आनंद आश्रमात नोटा उधळण्याच्या प्रकारावरून ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर टीका केली आहे. तर आनंद आश्रमात नोटा उधळल्या जातात हा आनंद दिघे यांचा अपमान आहे, असंही वैभव नाईक यांनी म्हटलं आहे. ‘आनंद आश्रममध्ये हजारो शिवसैनिक घडले. त्यांनी समाजसेवेचे काम केले. मात्र, आताचे शिवसैनिक हे बारमधील शिवसैनिक आहेत, हे उघड झाले आहे. मुख्यमंत्री यांनी गाजावाजा करून सिनेमा काढला. बार सुरू झाले त्यावेळी ते आनंद दिघे यांच्या नेतृत्वात फोडले गेले. मात्र, आज आनंद आश्रममध्ये पैसे उडविले जातात हा दिघेसाहेबांचा अपमान आहे’, असे वैभव नाईक म्हणाले. तर चौकशी करून संबंधित व्यक्तीचा हेतू समोर आला पाहिजे, असं शिवसेना नेते मंत्री उदय सामंत म्हणाले.
Latest Videos
Latest News