‘सामना’तून अजित पवार यांचा समाचार, शरद पवार यांच्या मेहनतीवर अजित दादांचा डल्ला, संजय राऊत काय म्हणाले?
VIDEO | अजित पवार यांच्यावर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा पुन्हा जोरदार हल्लाबोल, शरद पवार यांच्या मेहनतीवर अजित पवार यांनी डल्ला मारल्याचा केला आरोप! सामनातून अजित पवार यांच्यावर आरोप करताना संजय राऊत यांनी सोडले शाब्दिक बाण
मुंबई, २८ ऑगस्ट २०२३ | अजित पवार यांच्यावर संजय राऊत यांनी पुन्हा जोरदार हल्लाबोल केलाय. शरद पवार यांच्या मेहनतीवर अजित पवार यांनी डल्ला मारला, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली. उत्तर सभांमधून अजित पवार यांचे इतर नेते शरद पवार यांच्यावर हल्लाबोल करताय. मात्र अजित पवार स्वतः शरग पवार यांच्यावर बोलणं टाळून केवळ विकासावर बोलताय. असे असले तरी संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर सामनातून सडकून टीका केली. अजित पवार यांनी शरद पवार यांच्या मेहनतीवरच डल्ला मारण्याचा घणाघाती आरोप संजय राऊत यांनी केलाय. सामनातून अजित पवार यांच्यावर आरोप करताना संजय राऊत यांनी चांगलेच शाब्दिक बाण सोडल्याचे पाहायला मिळाले. सत्तेच्या मस्तवालपणातून जमा केलेल्या गजगंड इस्टेटीवर ईडी, इन्कम टॅक्सचे मुंगळे चढले. ते मुंगळे डसू लागल्यावर भाजपच्या गोठ्यात शिरणाऱ्यांनी एक लक्षात ठेवले पाहिजे की, २०२४ मध्ये नक्कीच सत्ताबदल होत आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?

