‘कुणाचं ऐकणार नाही…’, पवार-अदानींच्या मैत्रीवरून ठाकरेंची थेट भूमिका, बैठकीतील इनसाईड स्टोरी काय?
उद्धव ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत शरद पवार यांच्यासंदर्भात त्यांना विचारण्यात आले. यावर ते म्हणाले, माझं या बाबतीत देणंघेणं नाही, मोर्चा येत्या १६ डिसेंबर रोजी होणार म्हणजे होणार, असं त्यांनी ठामपणे सांगितले. या बैठकीत ठाकरे गटाचे आमदार, नेते, उपनेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
मुंबई, ५ डिसेंबर २०२३ : कुणाचं ऐकणार नाही, अयोग्य आहे त्यावर आवाज उठवला पाहिजे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शरद पवार आणि गौतम अदानी यांच्या मैत्रीवरून थेट भूमिका स्पष्ट केली आहे. शिवालय कार्यालयात नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी ही भूमिका घेतली आहे. तर येत्या १६ डिसेंबर रोजी उद्धव ठाकरे यांच्या गटाचा आदानी कार्यालयावर मोर्चा धडकणार असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली. तर उद्धव ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत शरद पवार यांच्यासंदर्भात त्यांना विचारण्यात आले. यावर ते म्हणाले, माझं या बाबतीत देणंघेणं नाही, मोर्चा येत्या १६ डिसेंबर रोजी होणार म्हणजे होणार, असं त्यांनी ठामपणे सांगितले. या बैठकीत ठाकरे गटाचे आमदार, नेते, उपनेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी नाव न घेता असेही म्हटले की मुंबई यांना तोडायची आहे पण हे तोडू इच्छित नाही. मुंबईचा विकास निती आयोगाच्या माध्यमातून आणि आदानी सारख्या उद्योगपतींना देताय आणि मुंबई तोडण्याचा घाट घालताय, असे म्हणत सरकारवर निशाणा साधलाय.