Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा दीपोत्सव, युतीचा कंदील उजळणार? उद्धव ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटन अन् चर्चा सुरू
दादरच्या शिवाजी पार्कात उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मनसे दीपोत्सवाचे उद्घाटन झाले. राज ठाकरेंच्या निमंत्रणावरुन उद्धव ठाकरे सहकुटुंब उपस्थित होते. या घटनेमुळे ठाकरे बंधूंमध्ये राजकीय युतीची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी महापालिका निवडणुका आणि महाविकास आघाडीतील संभाव्य बदलांसाठी ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
दादरच्या छत्रपती शिवाजी पार्कात मनसेच्या वतीने आयोजित दीपोत्सवाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहकुटुंब करण्यात आले. यावेळी राज ठाकरे यांनी आवर्जून उद्धव ठाकरे यांना निमंत्रित केले होते. राज ठाकरेंच्या निवासस्थानी काही वेळ थांबून ठाकरे बंधू एकत्र गाडीतून शिवाजी पार्कात आले. यावेळी राज ठाकरे गाडी चालवत होते तर उद्धव ठाकरे त्यांच्या बाजूला बसले होते.
तर दुसऱ्या गाडीत आदित्य ठाकरे यांच्यासोबत अमित ठाकरे उपस्थित होते. या एकत्र येण्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या चर्चांना उधाण आले आहे. शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करत “राऊतांच्या हातात आगपेटी देऊ नका” असे म्हटले. तर शिंदेंनी “इज्जत गेली गावाची आणि आठवण आली भावाची” अशी टिप्पणी केली. यावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देत “आठवण भावाचीच येणार, अमित शहांची येणार का?” असे विचारले. हे एकत्र येणे आगामी महापालिका निवडणुकांसाठी महत्त्वाचे मानले जात आहे.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...

