Gopichand Padalkar : घोडे लावण्याच्या तयारीत आता धनगर! पडळकरांनी फायनल सांगितलं… भुजबळ सांगतील तीच दिशा
ओबीसी एल्गार मेळाव्यात गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजाच्या दुहेरी भूमिकेवर प्रकाश टाकला. धनगर आरक्षणासोबतच त्यांनी ३४६ जातींच्या ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणावर भर दिला. छगन भुजबळ यांना ओबीसी चळवळीचे एकमेव नेते घोषित करत, त्यांच्याच नेतृत्वात सरसकट आरक्षणाचा विषय थांबवल्याचे पडळकर यांनी सांगितले.
बीड येथील ओबीसी एल्गार मेळाव्यात बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी ओबीसी समाजाच्या एकजुटीवर आणि आरक्षणाच्या संरक्षणावर भर दिला. धनगर समाजाला त्यांच्या अनुसूचित जमाती आरक्षणासाठी लढा देण्यासोबतच, ३४६ जातींच्या ओबीसी आरक्षणाचे संरक्षण करण्याची दुहेरी जबाबदारी पार पाडावी लागेल असे त्यांनी नमूद केले.
ओबीसींमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही पडळकर यांनी केला. यावेळी, त्यांनी माजी नेते गोपीनाथराव मुंडे यांच्या योगदानाला उजाळा दिला. ओबीसी चळवळीसाठी कोणत्याही प्रकारची घाई न करता, ऐक्य राखण्याचे आवाहन केले. छगन भुजबळ यांना ओबीसी समाजाचे एकमेव नेते म्हणून घोषित करत, “छगन भुजबळ साहेब ठरवतील ती दिशा आपली आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या नेतृत्वातच सरसकट आरक्षणाचा विषय थांबवण्यात यश आल्याचे पडळकर यांनी सांगितले.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?

