Legislative Council Election | उद्धव ठाकरेंनी नकार दिल्यास विधान परिषदेवर काँग्रेसचा दावा, बड्या नेत्याच्या विधानाने ठाकरे गटाला टेन्शन
महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत राजकीय हालचालींना वेग आला असून संभाव्य उमेदवारांबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना, “उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेत जावं, ही आमची भूमिका आहे,” असं स्पष्ट केलं.
महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत राजकीय हालचालींना वेग आला असून संभाव्य उमेदवारांबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना, “उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेत जावं, ही आमची भूमिका आहे,” असं स्पष्ट केलं. त्यांनी पुढे सांगितलं की, शशिकांत शिंदे यांनीही ठाकरे यांच्या विधानपरिषद प्रवेशाला पाठिंबा दर्शवला आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांकडूनही ठाकरे यांना विधानपरिषदेत जाण्याची विनंती करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर न जाण्याबाबत अद्याप काही उत्तर दिलेलं नाही. आता ठाकरे विधान परिषद लढवणार नसतील, तर ही जागा काँग्रेस लढवणार असं स्पष्ट विधान नाना पटोलेंनी केलं आहे. विजय वडेट्टीवार आणि सतेज पाटलांपाठोपाठ नाना पटोलेंनीदेखील एकसारखीच बाजू मांडली आहे.
Published on: Apr 28, 2026 11:17 AM
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा... पुन्हा नव्या मागणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली;
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदें

