Uddhav Thackeray Video : ठरलं… शिंदेंच्या बालेकिल्ल्यात निवडणूक लढवणार, अशी असणार ठाकरेंची रणनिती?
उद्धव ठाकरे यांनी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण बैठक घेतली. शिंदे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये निवडणूक लढण्याची ठाकरेंची रणनिती असल्याचे म्हणत कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना तयारीला लागण्याची सूचना उद्धव ठाकरेंनी दिल्यात.
पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी बैठक घेतली आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये निवडणूक लढण्याची उद्धव ठाकरे यांची रणनिती असल्याची मोठी माहिती समोर येत आहे. तर ठाणे पालिका आपलीच राहणार आतापासून तयारीला लागा, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी घेण्यात आलेल्या बैठकीत म्हंटलंय. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्याचे पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे यांनी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण बैठक घेतली. शिंदे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये निवडणूक लढण्याची ठाकरेंची रणनिती असल्याचे म्हणत कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना तयारीला लागण्याची सूचना उद्धव ठाकरेंनी दिल्यात. इतकंच नाहीतर ठाणे पालिका निवडणुकीच्या तयारीसाठी निरीक्षक नेमा, अशा सूचना उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आल्या आहेत. मुंबईनंतर ठाणे पालिकेकडे विशेष लक्ष देत उद्धव ठाकरे यांनी आढावा बैठक घेतली. बैठकीसाठी राजन विचारेसह ठाण्यामधील पदाधिकारी देखील उपस्थित होते.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

