राज ठाकरेंच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे मातोश्रीहून रवाना
उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीहून शिवतीर्थावर रवाना झाले आहेत. उद्या मतदान, परवा निकाल लागणार असल्याने या भेटीला महत्त्व आहे. प्रचार संपल्यानंतर आदित्य ठाकरेंनीही भेट घेतली होती. आता ठाकरे कुटुंबे मकर संक्रांतीनिमित्त मुंबादेवीच्या दर्शनासाठी एकत्रित जाणार आहेत.
उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीहून शिवतीर्थावर रवाना झाले आहेत. मुंबईतील स्थानिक निवडणुकांचे मतदान उद्या होणार असून, परवा निकाल जाहीर होईल. या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. काल प्रचार संपल्यानंतर आदित्य ठाकरेंनी देखील राज ठाकरे यांची भेट घेतली होती.
आज मकर संक्रांतीनिमित्त उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे तसेच राज ठाकरे आणि अमित ठाकरे हे संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्रितपणे मुंबादेवीच्या दर्शनासाठी जाणार आहेत. यापूर्वी उद्धव ठाकरे अनेकदा प्रचार संपल्यावर देवदर्शनासाठी जात असत, लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले होते. सध्या निवडणुकीचे आणि सणाचे वातावरण मुंबईत आहे. खासदार संजय राऊत देखील उद्धव ठाकरेंच्या भेटीपूर्वी शिवतीर्थावर पोहोचले होते.

