AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut | अशी अवस्था होईल की... पुन्हा कधीच सत्ता येणार नाही... संजय राऊतांनी आज पत्रकार परिषदेत हे काय सांगून टाकलं?

Sanjay Raut | अशी अवस्था होईल की… पुन्हा कधीच सत्ता येणार नाही… संजय राऊतांनी आज पत्रकार परिषदेत हे काय सांगून टाकलं?

| Updated on: Jun 26, 2026 | 11:26 AM
Share

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजपासून गद्दार खासदारांच्या मतदारसंघांचा दौरा सुरू केला आहे. ठाकरे गटातून फुटून शिंदे गटात गेलेल्या खासदारांच्या मतदारसंघात जाऊन ते कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजपासून गद्दार खासदारांच्या मतदारसंघांचा दौरा सुरू केला आहे. ठाकरे गटातून फुटून शिंदे गटात गेलेल्या खासदारांच्या मतदारसंघात जाऊन ते कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांशी संवाद साधणार आहेत. याबाबत खासदार संजय राऊत यांनी माहिती दिली. मात्र, याचदरम्यान ठाकरे गटातील काही आमदारांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची चर्चा रंगली आहे.

या चर्चांवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. “ते कोणालाही फोडू शकतात. उद्या देवेंद्र फडणवीस यांनाही फोडल्याचं सांगतील,” असा टोला त्यांनी लगावला. तसेच ‘ऑपरेशन टायगर’पासून सर्वात जास्त सावध देवेंद्र फडणवीस यांनी राहायला हवं, असंही ते म्हणाले. महत्त्वाची बाब म्हणजे हे फोडाफोडी करणारे सत्तारधारी एक वेळ येईव जेव्हा हातात सत्ता नसेल तर तेव्हा भयंकर अवस्था होईल… नंतर पुन्हा सत्ताच येणार नाही.

यावेळी राऊत यांनी खासदार फोडण्यासाठी पैशांचा वापर होत असल्याचा गंभीर आरोप केला. “6 खासदारांना 50-50 कोटी रुपये दिले गेले. पुढे अजून 25-25 कोटी द्यावे लागतील,” असा दावा त्यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण पुन्हा तापलं आहे.

Published on: Jun 26, 2026 11:26 AM

Follow Us