Video : पुन्हा एकदा शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार का?, उद्धव ठाकरे म्हणाले…
पुन्हा एकदा शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार का असं विचाण्यात आलं, तेव्हा हो काही नाही? कोणत्याही राजकीय पक्षाला महत्वकांक्षा असणं गैर नाही, असं उद्धव ठाकरे म्हणालेत. तुमचे मुख्यमंत्री होणं चुकलं?, असा प्रश्न संजय राऊतांनी (Sanjay Raut) मुलाखतीदरम्यान उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) विचारला. त्यावर ठाकरेंनी उत्तर दिलं, यात दोन गोष्टी आहेत, समजा मी त्या वेळेला यांना मुख्यमंत्री केलं […]
पुन्हा एकदा शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार का असं विचाण्यात आलं, तेव्हा हो काही नाही? कोणत्याही राजकीय पक्षाला महत्वकांक्षा असणं गैर नाही, असं उद्धव ठाकरे म्हणालेत. तुमचे मुख्यमंत्री होणं चुकलं?, असा प्रश्न संजय राऊतांनी (Sanjay Raut) मुलाखतीदरम्यान उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) विचारला. त्यावर ठाकरेंनी उत्तर दिलं, यात दोन गोष्टी आहेत, समजा मी त्या वेळेला यांना मुख्यमंत्री केलं असतं. तर यांनी दुसरंच काहीतरी केलं असतं. कारण यांची भूकच भागत नाहीये. यांना मुख्यमंत्रीपदही हवं आहे आणि यांना शिवसेना पक्षप्रमुख ही व्हायचं आहे. हे शिवसेना पक्षप्रमुखांसोबत यांची तुलना करत आहेत, ही राक्षसी महत्वकांक्षा आहे, त्याला हाव म्हणतात. एक दिलं की तुझं तेही माझं, माझं तेही माझं, याचं तेही माझं, इथपर्यंत यांची हाव गेलेली आहे. या हावरटपणांना सीमा नसते, असा घणाघात ठाकरेंनी केला.
Published on: Jul 27, 2022 10:49 AM
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
