शिवसेना अपात्र आमदारांच्या निकालानंतर महापत्रकार परिषद, उद्धव ठाकरे ‘या’ ठळक मुद्यांवर बोलणार
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिल्यानंतर आज दुपारी ४ वाजता उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद होणार आहे. निकालानंतर ही पहिलीच महापरिषद असल्याने सर्वांचं याकडे लक्ष लागलेलं आहे. या पत्रकारपरिषदेपूर्वी उद्धव ठाकरे यांची काल ग्रँड हयात हॉटेलमध्ये बैठक पार पडली
मुंबई, १६ जानेवारी २०२४ : शिवसेना अपात्र आमदारांच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिल्यानंतर आज दुपारी ४ वाजता उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद होणार आहे. निकालानंतर ही पहिलीच महापरिषद असल्याने सर्वांचं याकडे लक्ष लागलेलं आहे. या पत्रकारपरिषदेपूर्वी उद्धव ठाकरे यांची काल ग्रँड हयात हॉटेलमध्ये बैठक झाली. उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊत, अनिल परब आणि वकील यांच्यात रात्री उशिरा चार तास ही बैठक झाली. काल रात्री साडे आठ ते १२ वाजून ४० मिनिटांपर्यंत ही बैठक चालली. यानंतर आज ४ वाजता उद्धव ठाकरे नेमकी शाब्दीक वार करत कुणाची चिरफाड करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्षांनी सुप्रीम कोर्टाने आखून दिलेल्या चौकटीत दिला नसल्याचा आरोप, शिवसेनेच्या घटनेतील बदलाची निवडणूक आयोगाला माहिती दिल्याचे पुरावेही उद्धव ठाकरे मांडू शकतात.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

