AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | मुंबई महापालिकेची जबाबदारी आदित्य ठाकरेंकडे दिली जाणार? -Tv9

Special Report | मुंबई महापालिकेची जबाबदारी आदित्य ठाकरेंकडे दिली जाणार? -Tv9

| Edited By: | Updated on: Jan 03, 2022 | 9:15 PM
Share

उद्धव ठाकरे यांनी आपले चिरंजिव आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचं कौतुक केलं. आदित्य ठाकरे यांनी आपला ताण कमी केल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर पाठीच्या मणक्याबाबत नुकतीच मोठी शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर राज्यातील अनेक महत्वाच्या बैठका आणि हिवाळी अधिवेशनातही (Winter Session) सहभागी होऊ शकले नाही. त्यानंतर 1 जानेवारी रोजी उद्धव ठाकरे यांनी नगरविकास खात्याच्या बैठकीत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला आणि मालमत्ता करमाफीबाबत महत्वाची घोषणा केली. त्यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी आपले चिरंजिव आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचं कौतुक केलं. आदित्य ठाकरे यांनी आपला ताण कमी केल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. ‘आता आदित्य आहे. जे काम आपलं कर्तव्य म्हणून आणि केवळ काम म्हणून नाही, कर्तव्य म्हणून नाही तर मुंबई म्हणून, मुंबईवरचं प्रेम म्हणून शिवसेनाप्रमुखांनी जे काम सुरु केलं. रस्त्यांचं काम कसं सुरु आहे, नालेसफाईचं काम कसं चाललं आहे, सौंदर्यीकरणाचं काही असेल तर तिथे कसं सुरु आहे आणि त्याप्रमाणे ते तिथे सूचना देत. हे पाहत मोठा होत असताना मी सुद्धा मग रस्त्यांची कामं, साधारण ही कामं मध्यरात्रीनंतर सुरु होतात. आता दिवसाही कामं होतात. पण नालेसफाईचं काम त्या काळात काही ठिकाणी नाल्यात उतरुनही पाहिलं आहे. मग दहिसर नदीचं काम असेल, अजून कुठलं काम असेल. आता हा माझा ताण आदित्यने पूर्णपणे कमी केला आहे’, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंचं कौतुक केलं.

Published on: Jan 03, 2022 09:15 PM