AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray|उद्धव ठाकरेंचा ताण नेमका कोण कमी करतंय? पहिल्यांदाच जगजाहीर नाव सांगितलं

मुख्यमंत्र्यांनी आपल्या सहकाऱ्यांचे जाहीर आभार मानले. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी त्यांचा ताण कमी करणाऱ्या एका विशेष सहकाऱ्याचे पहिल्यांदा नाव जाहीर केले. त्यांचे तोंड भरून कौतुक केले. कोणाबद्दल बोलले मुख्यमंत्री, जाणून घेऊयात.

Uddhav Thackeray|उद्धव ठाकरेंचा ताण नेमका कोण कमी करतंय? पहिल्यांदाच जगजाहीर नाव सांगितलं
उद्धव ठाकरे
| Edited By: | Updated on: Jan 01, 2022 | 4:45 PM
Share

मुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंबईकरांना एक मोठे गिफ्ट दिले. ते म्हणजे मुंबईतील 500 चौरस फुटाखालील घरांना मालमत्ता कर माफ करण्यात आला. महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयामुळे मुंबईत 16 लाख कुटुंबांना फायदा होणार आहे. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांनी आपल्या सहकाऱ्यांचे जाहीर आभार मानले. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी त्यांचा ताण कमी करणाऱ्या एका विशेष सहकाऱ्याचे पहिल्यांदा नाव जाहीर केले. त्यांचे तोंड भरून कौतुक केले. कोणाबद्दल बोलले मुख्यमंत्री, जाणून घेऊयात.

आजापरणानंतर पहिलाच संवाद

आजारपणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अगदी ठणठणीत होऊन समोर आले. त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पुन्हा एकदा संवाद साधला. यावेळी सुरुवातीलाच तुम्हाला वाटले असेल, मी कोरोनाबद्दल बोलणार आहे, म्हणत एक मिश्किल चिमटा काढला. त्यानंतर मुंबईत सुरू असलेली कामे, शिवसेना आपली पाळेमुळे कसे विसरणार नाही म्हणून वचननाम्यातील शक्य असतील ती आश्वासने पूर्ण करू, असे ठासून सांगितले. शिवाय त्यात महत्त्वाचे म्हणजे पाचशे चौरस फुटाखाली घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबद्दल आपल्या सहकाऱ्यांचे जाहीरपणे कौतुक केले. त्यात मंत्री एकनाथ शिंदे, महापालिका आयुक्त इक्बाल चहल, महेश झगडे यांची नावे घेत त्यांचे व्यक्तीशः तर आभार मानलेच. शिवाय शिवसेना पक्षप्रमुख म्हणून आणि समस्त मुंबईकराच्या वतीने देखील त्यांचे जाहीर आभार मानले.

आठवणीत रमले

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, शिवसेनाप्रमुखांनी मुंबईवरती प्रेम केले. तेच प्रेम आम्ही पुढे नेत आहोत. शिवसेना वचन देते आण पाळतेही. खोटी वचने आम्ही देत नाहीत. जाहीरनाम्यातील अनेक वचने आम्ही पूर्ण केली आहेत. 1966 पासून मुंबईत जन्माला आलेली शिवसेना मुंबईकराच्या आशीर्वादाने मुंबई साभाळत आहे. शिवसेनाप्रमुख स्वतः जातीने जात आणि नालेसफाईपासून सारी कामे पाहत. ते पहात-पहात मी मोठा झालो, अशी आठवण सांगितली.

ती विशेष व्यक्ती कोण?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मी सुद्धा रस्त्याची कामे मध्यरात्री जाऊन पाहिली. नालेसफाई नाल्यात उतरून पाहिली. दहीसर नदीचे काम असो की अजून काम. हा माझा पूर्ण ताण आता आदित्यने कमी केला आहे. तो रात्री, अपरात्री सर्वांसोबत नगरसेवक, महापालिका अधिकारी यांच्यासोबत बाहेर जातो. कामांची पाहणी करतो, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच आदित्य ठाकरे यांचे पहिल्यांदाच जाहीर कौतुक केले.

इतर बातम्याः

मोठी बातमी: मुंबईकरांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, 500 चौ.फुटापर्यंतचा मालमत्ता कर माफ !

Video | वाघ तो वाघच! Mahindra Xyloला दातांनीच ओढलं, आनंद महिंद्रांना का नवल नाही वाटलं?

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.