Bhaskar Jadhav : वेळ गेल्यावर पश्चाताप… भास्कर जाधवांच्या स्टेटसची चर्चा, पक्षातील लोकांना काय सूचक इशारा?
शिवसेना ठाकरे गटामध्ये विनायक राऊत हे मोठ्या, पहिल्या फळीतल्या नेत्यांमध्ये असल्याचे मानलं जातं. तर पहिल्या फळीतल्या नेत्यांवर नाराज असल्याचं भास्कर जाधव यांनी सांगितलंय म्हणजे त्यांचा रोख हा राऊतांवर असल्याचे बोलले जात असताना आता त्यांच्या स्टेटसची चर्चा होतेय.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्याकडून सूचक स्टेटस ठेवण्यात आलं आहे. ‘वेळीच एखाद्या व्यक्तीची किंमत समजून घ्या…वेळ गेल्यावर पश्चाताप करत बसणं व्यर्थ आहे’, असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. इतकंच नाहीतर दिवा जळतानाच तुपाची गरज असते, दिवा विझल्यानंतर तूप ओतण्यात अर्थ नाही, असंही भास्कर जाधव यांनी स्टेटसमधून म्हटलंय. दरम्यान, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून आमदार भास्कर जाधव हे ठाकरे गटात नाराज असल्याची चांगलीच चर्चा होतेय. अशातच एक-दोन वेळा स्वतः भास्कर जाधव यांनी आपल्या मनातील खदखद जाहीरपणे व्यक्त केली होती. या नाराजीच्या चर्चा सुरू झाल्यानंतर आता अचानक भास्कर जाधव यांच्या या स्टेटसची चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे. या स्टेटसच्या माध्यमातून भास्कर जाधव यांनी आपल्याच पक्षातील लोकांना सूचक इशारा दिला आहे.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?

