मुख्यमंत्री शिंदे यांच्या बालेकिल्यावर उद्धव ठाकरे धडकणार

महेश पवार, Tv9 मराठी

Updated on: Jan 26, 2023 | 10:01 AM

ठाण्यात आज मोफत महाआरोग्य शिबीर भरविण्यात आले आहे. या शिबीराचे उदघाटन उद्धव ठाकरे करणार आहेत.

ठाणे : सत्ताबदल झाल्यानंतर उद्धव ठाकरे ( uddhav thacakrey ) आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात अर्थात ठाण्यात येत आहेत. ठाण्यात आज मोफत महाआरोग्य शिबीर भरविण्यात आले आहे. या शिबीराचे उदघाटन उद्धव ठाकरे करणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात अली आहे.

शिंदे गटाचे कार्यालय असलेल्या आनंदमठ शेजारीच हे आरोग्य शिबीर भरविण्यात आले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे आनंद दिघे यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. त्यानंतर ते टेभी नाक्यावरील जैन मंदिराला भेट देणार आहेत. या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे गटाने तलावपाळी परिसरात मोठी बॅनरबाजी केली आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI