‘मैं नरेंद्र दामोदरदास मोदी, ईश्वर की…,’ प्रचंड टाळ्यांच्या गजरात एनडीएचे तिसऱ्यांदा सत्तारोहण
नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टर्ममधील कॅबिनेटमध्ये महाराष्ट्रातील नितीन गडकरी, पीयूष गोयल, मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे, शिंदे गटातील खासदार प्रतापराव जाधव, आरपीआयचे रामदास आठवले यांना देखील मंत्रिमंडळातील सदस्य म्हणून शपथ देण्यात आली आहे.
आजच्या घडीला भाजपातील सर्वाधिक शक्तीमान असलेल्या नरेंद्र मोदी यांनी अखेर तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात रंगलेल्या या सोहळ्यात टाळ्यांच्या प्रचंड गजरात त्यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यानंतर असे करणारे ते दुसरे पंतप्रधान ठरले आहेत. या सोहळ्याला देश आणि विदेशातील पाहुणे मंडळी उपस्थित होती. या निवडणूकीत भाजपाला उत्तर प्रदेशात मोठा फटका बसल्याने भाजपाच्या एकट्याच्या बळावर बहुमताच्या जवळ पोहचता आले नाही. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या मदतीने एनडीएने बहुमताचा आकडा गाठल्याने मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याची संधी मिळाली आहे.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

