AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदी यांच्या शपथविधीला शाहरुख खान आणि मुकेश अंबानी देखील उपस्थित...

मोदी यांच्या शपथविधीला शाहरुख खान आणि मुकेश अंबानी देखील उपस्थित…

| Updated on: Jun 09, 2024 | 7:48 PM
Share

नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या पंतप्रधान पदाची शपथ घेण्याची तयारी सुरु आहे. या सोहळ्याला देश-विदेशातील मंडळी उपस्थित राहीली आहेत. या सोहळ्याला बॉलिवडूची मंडळी देखील उपस्थित राहीली आहेत.

नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनाच्या भव्य प्रांगणात हा सोहळा रंगतोय. या सोहळ्यात जवळपास सात ते आठ हजार पाहूण्यांना निमंत्रित देण्यात आले आहे. या सोहळ्यात साठ हून अधिक मंत्री शपथ घेणार आहेत. लोकसभा 2024 च्या निवडणूकात भाजपाला 240 जागा मिळाल्याने बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. तरीही एनडीएच्या मदतीने हे सरकार स्थापण होणार आहे. या सोहळ्याला चित्रपट क्षेत्रातील तारे देखील उपस्थित राहीले आहेत, साल 2014 मध्ये भाजपाला 282 जागा मिळाल्या होत्या , साल 2019 मध्ये 301 सगळ्यात मोठा पक्ष ठरला होता. या सोहळ्याला अभिनेता शाहरुख आणि रविना टंडन, अक्षय कुमार आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांना देखील निमंत्रित करण्यात आले आहे.

Published on: Jun 09, 2024 07:35 PM