Union Budget 2025 : मोदी सरकारची सर्वात मोठी घोषणा, गंभीर आजारांवरील 36 औषधं टॅक्स फ्री
अर्थसंकल्पात कर्करोगाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी कर्करोगाची औषधे स्वस्त करण्याची घोषणा करण्यात आली आहे. सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये डे केअर कर्करोग केंद्रे स्थापन करण्याच्या योजनेला पाठिंबा देत कॅन्सर डे केअर सेंटर बनवण्याचा निर्णयही केंद्र सरकारने घेतला आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी २०२५ या वर्षांचा देशासाठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. ज्यामध्ये त्यांनी कर्करोगाची औषधे, मोबाईल बॅटरी, विणकरांनी बनवलेले कपडे, चामड्याच्या वस्तू, मोबाईल फोन, एलईडी आणि एलसीडी टीव्ही आणि इलेक्ट्रिक वाहने स्वस्त होणार असल्याची घोषणा केली. तर आयात केलेल्या मोटारसायकली, इंटरॅक्टिव्ह फ्लॅट्स, पॅनेल डिस्प्ले आणि प्रीमियम टीव्ही महाग होणार असल्याचे म्हटले. अशातच अर्थसंकल्पात कर्करोगाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी कर्करोगाची औषधे स्वस्त करण्याची घोषणा करण्यात आली आहे. सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये डे केअर कर्करोग केंद्रे स्थापन करण्याच्या योजनेला पाठिंबा देत कॅन्सर डे केअर सेंटर बनवण्याचा निर्णयही केंद्र सरकारने घेतला आहे. कर्करोगाच्या रुग्णांना चांगल्या आरोग्य सेवा देण्यासाठी ही योजना चांगली असून आता कर्करोगासह इतर गंभीर आजारांवरील ३६ जीवनावश्यक औषधे सरकारने स्वस्त केली आहेत. त्यामुळे गंभीर आजारानं ग्रासलेल्या रूग्णांना आता मोठा दिलासा मिळणार आहे.

'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?

'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी

‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला

'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका
