Narayan Rane Arrested | नारायण राणे यांना जेवणाच्या ताटावरुन उठवलं? नेमकं काय घडलं?
भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणें यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानशिलात लगावण्याची भाषा केली होती. या वक्तव्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे. राणे यांना जेवत असताना अटक करण्यात आली आहे.
नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे त्यांना अखेर अटक करण्यात आली आहे. आधी नारायण राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. रत्नागिरी कोर्टाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. त्यानंतर आता अखेर नारायण राणे यांना अटक करण्यात आली आहे. नारायण राणेंविरुद्ध नाशिक, पुणे, रायगड अशा विविध ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता. नाशिक आणि पुणे पोलिसांनी कोकणात पथकं पाठवली होती. त्यानंतर रत्नागिरी पोलिसांनी राणेंना अटक केली. दरम्यान राणे यांना जेवत असताना अटक करण्यात आली आहे. अशाप्रकारचा एक व्हिडीओ TV9 च्या हाती आला आहे.
यावेळी पोलिसांनी नारायण राणे यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप आमदार प्रसाद लाड यांनी केलाय. इतकंच नाही तर राणे यांच्या जीवाला धोका असल्याचा गंभीर आरोपही लाड यांनी केलाय. राणे जेवण करत असताना पोलिसांनी त्यांचं जेवणाचं ताट खेचण्याचा प्रयत्न केला. तसा एक व्हिडीओ आपण रेकॉर्ड केल्याचं लाड यांनी सांगितलं. इतकंच नाही तर लाड यांनी एक व्हिडीओही दाखवला आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

