Narayan Rane | जामिनावर सुटल्यानंतर राणे आज पोलिसांसमोर हजर राहणार का?

केद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना अत्यंत खालच्या भाषेत टीका केली होती. त्याच टीकेच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी राणेंना अटक केली होती. विशेष म्हणजे राणे यांनी अटकपूर्व जामीनसाठी देखील अर्ज केला होता. पण त्यांचा तो अर्ज फेटाळण्यात आला होता.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Rohit Dhamnaskar

Aug 30, 2021 | 8:48 AM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी महाड न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यांचा सशर्त जामीन मंजूर केला होता. त्यानुसार राणेंना 30 ऑगस्टला अलिबाग पोलिसांत हजेरी लावण्याचा आदेश देण्यात आला. त्यामुळे नारायण राणे आज अलिबाग पोलीस ठाण्यात एनसीपीकडे हजेरी लावण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर अलिबागमध्ये मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

केद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना अत्यंत खालच्या भाषेत टीका केली होती. त्याच टीकेच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी राणेंना अटक केली होती. विशेष म्हणजे राणे यांनी अटकपूर्व जामीनसाठी देखील अर्ज केला होता. पण त्यांचा तो अर्ज फेटाळण्यात आला होता. अखेर महाडमध्ये प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी बाबासाहेब शेख पाटील यांच्या कोर्टासमोर झालेल्या सुनावणीत नारायण राणे यांना दिलासा मिळाला होता. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर महाड कोर्टाकडून नारायण राणे यांना जामीन मंजूर करण्यात आला होता. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर राणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर बचाव पक्षाकडून राणे यांना जामीन देण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार न्याय दंडाधिकाऱ्यांनी राणे यांना काही अटीशर्ती ठेवून जामीन मंजूर केला.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें