Vegitable Price Hike : अवकाळीचा फटका; भाज्यांच्या दराने गाठली शंभरी, गृहिणींचं बजेट कोलडलं
Unseasonal Rain Effect : अवकाळी पावसाने राज्यात धुमाकूळ घातलेला आहे. त्याचा फटका शेती पिकांना आणि शेतकऱ्यांना बसल्याने आता बाजारात भाज्यांच्या किमती वाढल्या आहेत.
राज्यातल्या अनेक भागात गेल्या 8 दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. या पावसाचा फटका शेतकऱ्यांबरोबरच आता सर्वसामान्य जनतेला देखील चांगलाच बसलेला आहे. अवकाळी पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असल्याने आता बाजारात भाज्यांचे दर देखील वाढलेले बघायला मिळत आहे.
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतलेला आहे. त्यामुळे बळीराजा पुरता खचलेला आहे. तर दुसरीकडे भाजी मंडईमध्ये भाजीपाल्याच्या दरात देखील चांगलीच वाढ झालेली बघायला मिळत आहे. बाजारात भाज्यांची आवक कमी झालेली आहे. मागणी तसा पुरवठा होत नसल्याने भाज्यांचे दर चांगलेच कडाडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री बसणार आहे. गवार, मटार, फरसबी सारख्या भाज्यांनी शंभरी गाठली आहे. तर काही भाज्यांनी अर्ध शतक गाठलेलं आहे. त्यामुळे गृहिणींचं बजेट कोलंडलं आहे.
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...

